Thursday, 14 January 2010
जागो पेरेंट्स जागो ......
महाराष्ट्राला शेतकरी आत्महत्या मधून सावरण्याची संधी अजुन मिळयचिच आहे, आणि आता नवीन प्रश्ना उभा ठाकलाय! विद्यार्थी आत्महत्या! यापैकी बहुतेक कारणे अपेक्षित गुण न मिळाल्याने झाल्या असे निदर्शनास आले आहे. याला जबाबदार कोण? शासन? शिक्षण व्यवस्था? शाळा? समाज? शिक्षक की विद्यार्थी?
माझ्या मते पालक! होय पालक! आपल्या पाल्याला अवाजवी अपेक्शांच्या ओझ्याखाली दाबणारे आपणच ना? तू डॉक्टर झाला पाहिजे, तू इंजिनीयर, ऑफीसर, मोठ्ठा झाला पाहिजे असे म्हणून त्यांना दबावाखाली ठेवणारे आपणच ना? आपला बच्चा जेंव्हा त्याच्या मनाणे काही करू इछ्छितो तेंव्हा त्याला अभ्यासाचा सल्ला देणारे आपणच ना? अभ्यास बुडेल म्हणून शाळेच्या कार्यक्रमात त्याला भाग न घेऊ देणारे आपणच ना? माझ्या आयुष्यात जे करू शकलो नाही ते माझ्या पाल्याने करावे, अशी अपेक्षा का? आपण आपल्या मुलावर अपेक्षान्चे ओझे तर लादत नाही ना?
खरे म्हणजे ९८ टक्के लोकांना त्यांचा आवडीचा जॉब कधीच मिळत नाही. स्वतहाचे क्षण आठवा. काय इछ्छा होती तुमची? आणि काय करताय आता? केवळ पैसा कमावणे हेच का आयुष्याचे उद्दिष्ट आहे? गडगंज पैसा कमावणारे खरेच आनंदी आहेत काय? तुमचे काम तुम्ही जीवनाचे ध्येय म्हणून स्वीकारले आहे का? मग मुलांवरच जबरदस्ती का?
मित्रहो, ओळखा आपल्या पिल्लुला. मोकळ बोला कधीतरी त्याचेशी. मित्र बना त्याचे. त्याच्यातील गुण त्याची आवड यावर चर्चा करत राहा. त्याच्या आवडीने करियर् निवडायला मदत करा. आणि आयुष्यभर त्याला आनंदी, सुखी पहा. आयुष्यभर एक चांगले आणि मुलांकडून प्रेम मिळत राहणारे पालक बना. आणि एकदा चित्रपट जरूर बघा ...... ३ इडीयट्स.
Subscribe to:
Post Comments (Atom)
really a eye opener article for all parents
ReplyDelete