Wednesday, 20 January 2010

भारतियांसाठी जिजाऊ जयंती हाच खरा मदर्स डे

एक रम्य सकाळ..... १२ जानेवारी२०१० - सकाळी ०८ची वेळ,कडाक्याची थंडी पडेलेली,मी व माझी मैत्रीण जिजाऊ निमीत्ताने आजीसपुर ह्या गावी आलो. तसे पहिले तर आजीसपुर हे गाव बुलडाना हून ७ ते ८ की. मी. च्या अंतरावर आहे.अर्ध्या आजीसपुरचे लोकांचा आमच्या रुग्णालयाशी सम्‍बंध आहे. तेव्हा या गावात आपला सत्कार होणार,आपण सर्व गावकर्‍यना भेटणार या आनंदात मी गावात शिरले. सत्काराचा कार्यक्रम छोटासा असेल,सकाळ च्या धावपळीच्या वेळी कोण कार्यक्रमाला येणार असे मला वाटले............. पण चित्र अगदी वेगळे होते कार्यक्रम एका ज़ी. प. शाळेत आयोजित केला होता. शिवाजी महाराजांच्या पुतळ्या पुढे उत्साही मुले व गृहिणी आपली घरची कामे आटपून कार्यक्रमाला ह्जर होत्या .सगळ्यात सर्वात चांगली गोष्ट म्हणजे गावातील सर्व वीर माता (ज्यांचे पुत्र सेनेत तैनात आहे) ह्जर होत्या. दिवसच असा होता राष्ट्रमाता जिजाऊ यांचा जन्म दिवस.४१२ वर्षा पुर्वी जन्मलेल्यै जिजाऊनि आसे काही असामान्या काम केले कि आज ४१२वर्षा नंतर ही आमचे ऊर अभिमानानी भरून येते .ज्या काळात रूढीवाद स्त्री स्वातंत्र्य या व इतर विचारांनी समाज बरबटलेला होता त्या वेळेस जिजाऊ नि मोठ्या हिमतीने शिवबा ला घडविले. त्या काळात त्यांच्या मनात स्वराज्याचे बी पेरेले. मावल्याच्या सहयाने शिवबा ने ते मिळवून दाखवले .सगळे मुगल सम्राट जंव्हा विलसेच्य गरतेत अडकले होते तेंव्हा, शिवाजी मात्र अहोरात्रा घोड्याच्य पाठी वर बसून आपले राज्या वाढवीत होते .शिवाजिना छ्त्रपती ही पदवी मिळावी म्हणून जिजाऊ ने त्यांचा राज्याभिषके घडून आणला खरे तर आम्हा भारतियांसाठी जिजाऊ जयंती हाच खरा मदर्स डे आहे. राष्ट्रमाता जिजाऊंची प्ररणा प्रत्येक भारतिया स्त्री ने घेतली पाहिजे. या थोर मातेच्या जयंती च्या दिवशी घेतलेला आमचा सत्कार, तसेच आमच्या हातून वीर मातांचा सत्कार सोहळा अविस्मरणीय होता.

No comments:

Post a Comment